ब्रेकिंग न्यूज | तलासरीत समाजसेवेचा अनोखा उपक्रम!
परमेश्वराच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने व आनंदभाई ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने — तलासरी तालुक्यातील निर्मला विद्यालय, गाव कुर्झे (जि. पालघर) येथे आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला.
सामाजिक कार्यकर्ता डॉ. योगेश सुभाष बन यांच्या माध्यमातून ३५५ आदिवासी विद्यार्थी (मुलं-मुली) यांना दप्तर, वह्या, ड्रॉइंग बुक, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, पट्टी यांसारखं शैक्षणिक साहित्य वाटण्यात आलं. 📚✏️
या उपक्रमाच्या वेळी डॉ. बन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणा देत सांगितले की
“स्पर्धा परीक्षा किंवा आवडीच्या क्षेत्रात मेहनत करून आपण क्लास वन ऑफिसर होऊ शकतो, आपल्या कुटुंबाचे, गावाचे व जिल्ह्याचे नाव उज्वल करू शकतो.”
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून संपूर्ण वातावरण भावुक आणि उत्साहवर्धक बनले. 😇
👉 ही फक्त साहित्यवाटप नव्हे, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे!

